माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90% अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो. या योजनेकरिता सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करणेसाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी निकषानुसार व आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्ताव दि. 01 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करणेबाबत यापुर्वी मुदत देण्यात आलेली होती. तथापि आता सदर योजनेचे परिपुर्ण अर्ज सादर करणेस, 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता इच्छुक बचत गटांनी दि 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन, समाज कल्याण सांगलीचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
