Latest Marathi News

BREAKING NEWS

शेटफळेत पती-पत्नीस मारहाण : पोलिसात गुन्हा दाखल

0 1,513

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे संगनमत करून पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात आबासो विष्णू गायकवाड याने फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी आबासो विष्णू गायकवाड हे दिनांक २९ रोजी दुपारी १२.०० च्या दरम्यान त्यांच्या शेता मध्ये समाईक विहिरी वरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी बाजीराव धोंडीबा गायकवाड, दगडू धोंडीराम गायकवाड, सुनिता बाजीराव गायकवाड, मंडोदरी शहाजी गायकवाड सर्व रा. शेट फळे यांनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवुन फिर्यावीस छातीत, पाठीत, डोक्यात, लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीची पत्नी पत्नी रंजना हिला देखील यावेळी शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण करून तिचे डोक्याचे केस उपटून दमदाटी केली आहे.

Manganga

याबाबत आटपाडी पोलिसात फिर्यादी आबासो विष्णू गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील आरोपी विरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोहेकॉ कोरवी करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!