Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगद्यात भीषण अपघात, दोघे ठार; पाच जण जखमी

0 329

 

पुणे: राष्ट्रीय महामार्गावरील भुईंज हद्दीमध्ये खंबाटकी बोगद्यात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन ठार, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

 

Manganga

पुण्यातील सराफ कुटुंबीय मोटारीतून गोकर्ण महाबळेश्वरला गेले होते. सहल संपवून पुण्याला परत जात असताना त्यांच्या गाडीला खंबाटकी बोगद्यात अपघात झाला. ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यावरील कठड्याला धडकली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलीही समावेश जखमींना शिरवळच्या जोगळेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे खंबाटकी बोगद्यात वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी भुईंज पोलिसांनी तत्काळ धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन वाहतूक सुरळीत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!