Latest Marathi News

BREAKING NEWS

८ लाखाचा गुटखा जप्त, चौघांवर गुन्हा दाखल

0 200

 

शहरातील दोन वेगवेगळ्या घटनेत तब्बल ८ लाखाचा तंबाखूजन्य गुटखा मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी ४ जणांवर गुन्हे दाखल केले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. शहरातील दोन वेगवेगळ्या घटनेत तब्बल ८ लाखाचा तंबाखूजन्य गुटखा मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी ४ जणांवर गुन्हे दाखल केले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Manganga

उल्हासनगर कॅम्प नं-५, २५ सेक्शन भागातील बैरेक नं-१६८३ मधील घरात तंबाखूजन्य गुटक्याचा साठा करून ठेवल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी रात्री ९ वाजता धाड टाकून घरातून ७ लाख ८८ हजार १५२ रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. याप्रकरणी किशन चुणीलाला शर्मा, श्याम रोशनलाल भाटिया व टोनी चुग या तिघांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर दुसऱ्या घटनेत शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बुधवारी पहाटे सव्वा पाच वाजता पंजाबी कॉलनी येथील एका दुकानावर धाड टाकून दुकानात विक्रीसाठी ठेवलेला १९ हजार ३१५ रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दुकानदार ज्ञानेश्वर महाजन याच्यावर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!