बिहारच्या मुजफ्फरपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती सुनीतासोबत झालेली घटना वाचून अंगावर काटा येतो. मनात धस्स होते. यूटरसला इन्फेक्शन झाल्यावर सुनीता एका नर्सिंग होममध्ये उपचार घेण्यासाठी गेली.
मोठ्या विश्वासाने ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती, तिथेच तिच्या दोन्ही किडनी चोरी करण्यात आल्या. इतकंच नाही तर ज्या पतीने आयुष्यभर साथ देण्याचे आश्वासन दिले होते तोही सोडून गेला. तीन मुले आहेत. मजुरी करून मुलांचे पालन पोषण करत होती. आता हॉस्पिटलमध्ये भरती आहे. शेवटचे दिवस मोजत आहे.

मुजफ्फरपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती सुनीतासोबत झालेली घटना वाचून अंगावर काटा येतो. मनात धस्स होते. यूटरसला इन्फेक्शन झाल्यावर सुनीता एका नर्सिंग होममध्ये उपचार घेण्यासाठी गेली. तिथे डॉक्टरने तिच्या दोन्ही किडनी काढल्या आणि फरार झाला. आता सुनीतावर मुजफ्फरपूरच्या SK मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. तिची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. दर दोन दिवसांनी तिच्या डायलिसिस करावे लागते. अनेक लोक किडनी देण्यासाठी पुढे आले. पण मॅच होत नसल्याने तिचे ट्रांसप्लांट होऊ शकले नाही.
अकलू राम जाताना सुनीताला म्हणाला की, आता मी तुझ्यासोबत राहू शकणार नाही. त्यामुळे मी जात आहे. पतीसोबत झालेल्या भांडणाचा उल्लेख करत सुनीता रडत होती. ती म्हणाली की, जेव्हा तिची तब्येत चांगली होती तेव्हा ती स्वत: मजुरी करत होती. मुलांना काही कमी पडू देत नव्हती. पतीचे शेवटचे शब्द आठवत ती म्हणाली की, ‘जाताना तो म्हणाला होता की, आता तुझ्यासोबत जगणं अवघड आहे. हॉस्पिटलमध्ये सुनीताची आई तिची देखरेख करत आहेत. त्या म्हणाल्या की, पती-पत्नीमध्ये काय वाद झाला यावर ती काहीच बोलणार नाही.