Latest Marathi News

BREAKING NEWS

वाहनांची तोडफोड आणि हातात कोयते; येरवड्यात दोन गटांत तुफान राडा

0 211

 

 

पुणे: येरवडा भागात दोन गटात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तरुणांनी दारूच्या बाटल्या घरावर फोडल्या, दगडफेक केली. एवढेच नव्हे तर, हातात तलवारी, कोयते नाचवत परिसरात दहशत निर्माण केली. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने एकाच्या डोक्यात कोयता मारून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Manganga

अब्दुल्ला आमीरउल्ला खान असे कोयत्याचा हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. टोळक्याकडून करण्यात आलेल्या या दगडफेकीत रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेमोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा हत्यारे बाळगणे, दहशत माजविणे अशा कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी आनशा नावाच्या मुलाने “या कुत्राला आज सोडायचे नाही,” असे म्हणून त्याच्या हातातील कोयत्याने जीवे मारण्याचा उद्देशाने खान याच्या डोक्यात दोन वेळा वार केले. यात अब्दुल्ला आमीरउल्ला खान जखमी झाला. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!