Latest Marathi News

BREAKING NEWS

कर्ज फेडले नाही म्हणून महिलेला सावकाराने दिली धमकी

0 310

 

कोल्हापूर: कर्ज न फेडल्याने महिलेला अपशब्द वापरत धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातून समोर आला आहे. एवढेच नव्हे तर, कर्ज वसुलीसाठी महिलेला गुंडांकडून मारहारणही करण्यात आली आहे. या सावकाराने कर्ज फेडा अन्यथा वेश्याव्यवसाय करायला लावू अशी धमकी दिली आहे. या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Manganga

धमकी देण्यात आलेल्या महिलेनी सावकाराकडून 25 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यावर आता सावकार जबरदस्तीने 85 लाखांची वसुली करण्याचा प्रयत्न करत आहे. सावकाराच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलांनी पोलीस ठाणे गाठले.

महिलेला कागदपत्र सादर करण्या सांगत जाण्यास सांगण्यात आले. या प्रकरणात पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याचे महिलेचे म्हणणे आहे. गुंडांच्या भीतीमुळे महिलेच्या मुलांना घराबाहेर पडण्यास भीती वाटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!