देव कधीतरीच देतो पण ‘छप्पर फाडके…’ असे आपण कित्येकदा ऐकले असेल. कित्येक जणांचे आयुष्य एका रात्रीत बदललेल्या गोष्टीही आपण ऐकल्या असतील. तर अशा लोकांचे नशीब चांगले आहे असेही आपण म्हणतो. अशाच एका तरूणाचे आयुष्य एका रात्रीत बदलले आहे. अरविंद सिंह कुशवाहा असे या तरूणाचे नाव असून या तरूणाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
अरविंद हा उत्तरप्रदेशमधील भाटपारराणीमधील रघुनाथपूर येथील रहिवाशी आहे. शुक्रवारी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान झालेल्या पहिल्या टी२० सामन्याने त्याचे एका रात्रीत नशीब पालटले आहे. त्याने ड्रीम ११ हा खेळ खेळून अवघे ३५ रूपये लावून ७० लाख रूपयांचे बक्षीस जिंकले आहे. बक्षिस जिंकल्यानंतर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून तेथील आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्याचे गावात येऊन स्वागत केले आहे.

त्याने रविवारी झालेल्या सामन्यात ड्रीम ११ वर ३५ रूपये लावले होते. त्याने या खेळात ९५१.५ अंकासह पहिली रँक प्राप्त केली आणि ७० लाखांचे बक्षीस जिंकले. तर सामना संपल्यानंतर काहीच वेळात अरविंद यांच्या खात्यामध्ये टॅक्स कट होऊन ४९ लाख रूपये जमा झाले आहेत. तर ९५ लाख लोकांना मागे टाकून जिंकलेल्या बक्षीसामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.