माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बनपुरी येथील अल्पवयीन मुलगी ही घरी असताना आरोपी किशोर शहाजी चव्हाण रा. हिंगणी ता. माण याने दिनांक 29 रोजी बनपुरी येथून तिचे अपहरण केले. याप्रकरणी आटपाडी पोलिसात कलम 363 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
