माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : सोन्याचे दागिने बनविण्या करीता दिलेले सोने लंपास केल्याची घटना आटपाडी मध्ये घडली असून या प्रकरणी ओम गणेश ज्वेलर्सची मालक शंकर रघुनाथ चव्हाण यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी येथे फिर्यादी शंकर रघुनाथ चव्हाण यांचे ओम गणेश ज्वेलर्स हे सोने विक्रीचे दुकान आहे. फिर्यादी यांनी आरोपी उदय आनंदा डलाई याला सोन्याचे दागिने बनविण्यासाठी नऊ लाख चोवीस हजार रुपयांचे सोने विश्वासाने दिले होते. परंतु आरोपी उदय आनंदा डलाई याने फिर्यादी यांना सोन्याचे दागिने न देता त्यांची फसवणूक केली आहे.

याबाबत शंकर चव्हाण यांच्या फिर्यादी वरून आरोपी उदय आनंदा डलाई रा. सराफकट्टा, सांगली मूळ गाव कोलकाता याच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात कलम 420, 436 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षण शरद मेमाणे करीत आहेत.