Latest Marathi News

BREAKING NEWS

भरधाव ट्रकने धडक दिल्याने वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

0 529

कोरेगाव : कोरेगाव शहरात पंचायत समिती कार्यालयानजीक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत येऊन समोर येणाऱ्या दुचाकीला भरधाव मालट्रकने जोरात धडक दिली. या अपघातात तांदूळवाडीतील वृद्ध दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास झाला. कोरेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

 

बजरंग नारायण काटकर (वय ५९) व पत्नी शोभा बजरंग काटकर (५५, दोघे रा. तांदूळवाडी, ता. कोरेगाव) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती असे की, बजरंग काटकर व शोभा काटकर हे दोघे दुचाकीवरून कोरेगाव शहरात येत होते. त्याचवेळी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली ही कुमठे फाट्याच्या दिशेने निघाली होती. ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत भरधाव मालट्रक निघाला होता. ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. दुचाकी सुमारे वीस ते पंचवीस फूट फरफटत गेल्याने काटकर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.

Manganga

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने काटकर दाम्पत्याला ग्रामीण रुग्णालयात नेले. अपघातानंतर मालट्रक चालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावला आहे. ग्रामीण रुग्णालयात बजरंग काटकर व शोभा काटकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!