माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : सांगली जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आकाराम मोरे-पाटील यांची यपावाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार व सोहळा आज रविवार दिनांक २९ रोजी सायंकाळी ५.३० वा. संपन्न होणार आहे.
कार्यक्रमास जिल्ह्याचे खास.संजयकाका पाटील, आम. गोपीचंद पडळकर, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

आकाराम मोरे-पाटील यांनी यपावाडी ग्रामपंचायतच्या झालेली पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरलेल्या लढतीत विजय प्राप्त केला होता. आता उपसरपंच निवडीमध्ये त्यांची यपावाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आज त्यांचा नागरी सत्कार व जीवन गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.