नुकसान : उजनीचा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांची पिके गेली वाहून : शेतजमीन पाण्याखाली
माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर : उजनी पाटबंधारे विभागाचा डावा कालवा पाटकुल (ता. मोहोळ, जि.सोलापूर) येथे आज (दि.२९) सकाळी फुटला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काढणीला आलेल्या द्राक्ष बागांसह ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच शेकडो एकर शेतीमध्ये पाणी साचून राहिले असून कालव्याजवळ राहणाऱ्या वस्त्यांचा यामुळे संपर्क तुटला आहे. त्यामुळे या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये ५०० क््यु्सेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. आज सकाळी पाटकुल गावाजवळूण वाहणाऱ्या गावात गंगाधर सातपुते वस्ती नजीक हा कालवा फुटल्याने शेतात पाणी शिरून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये पिकांसह विहिरींचे देखील मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.