मुंबई : ज्येष्ठ महिला शिक्षिकेला एटीएम कार्ड चालू करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करून तिच्या खात्यातून लाखो रुपये काढणाऱ्या दोघांना मालाड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे दोघेही आरोपी आरोपी बँकेत ग्राहक म्हणून उभे राहतात, संधी पाहून ते ज्येष्ठ नागरिकाला मदतीच्या नावाखाली दुसऱ्या एटीएम केंद्रात घेऊन जातात त्यांची फसवणूक करून पळून जातात अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे.

त्याचबरोबर
सद्या सेवानिवृत्त महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून अधिक तपास करत आहेत. मालाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून नवीन एटीएम कार्ड मागवले होते.नवीन एटीएम कार्ड घेऊन महिला बँकेत गेली.
बँक कर्मचाऱ्यांना एटीएम कार्ड सक्रिय करण्यास सांगितले. बँकेचे कर्मचारी एटीएम कार्ड चालू करत असताना याचदरम्यान 1 आरोपी ग्राहक म्हणून बँकेच्या एटीएम मशीनजवळ उभा राहून महिलेच्या एटीएम कार्डचा पिन बघत होता. काही वेळाने एटीएम चालू होत नसताना त्या गुंडाने महिलेला सांगितले की, दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन लगेच कार्ड चालू करुया.
त्यानंतर काळ्या-पिवळ्या टॅक्सीत महिलेला सोबत घेऊन काही अंतर गेल्यावर आणखी एक गुंडही त्या टॅक्सीत घुसला आणि दोघांनी मिळून महिलेला एटीएम सेंटरमध्ये नेले. तिथे एटीएम कार्ड चालू केले आणि महिलेला दुसरा डमी पाठवला. कार्ड आणि महिलेच्या खात्यातून मूळ चालू एटीएम कार्डने ४० हजार रुपये काढून लगेचच तो फरार झाला. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 5 वेगवेगळ्या बँकांचे डमी एटीएम कार्ड, 2 मोबाईल फोन, 15 हजारांची रोकड जप्त केली आहे.