पुणे: मुंबईत सकल हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा आणि धर्मांतर विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या मोर्च्यातून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या मोर्चाची खिल्ली उडवली आहे.
मुंबईतील लिंगायत समाजाच्या मोर्चावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकतर हा मोर्चा सरकार विरोधात आहे. हे असंवेदनशील सरकार आहे म्हणून लोकांना रस्त्यावर उतरायला लागतं आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घ्यायला हवे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी त्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावरही भाष्य केले. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आहे. बाळासाहेबांनीच त्यांचा उत्तराधिकारी नेमला आहे. त्यामुळे ठाकरे गटालाच निवडणूक चिन्हं मिळायला हवं, असं माझं स्पष्ट मत आहे, असं त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या विषयावर बोलणं टाळले हा विषय आता खूप वेळा झाला आहे. जयंतराव पाटील देखील यावर बोलले आहेत. त्यामुळे आणखी बोलण्याची गरज नाही असं त्या म्हणाल्या.