जालना: जालना शहरातील मोतीबाग परिसरात असलेल्या मोती तलावात दुपारच्या सुमारास एका ४८ वर्षीय विवाहितेने उडी घेऊन आत्महत्या केली.जयश्री गणेश पोलास असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, जयश्री या जालना तालुक्यातील नेर जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या तर नायब तहसीलदार गणेश पोलास यांच्या पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे.आपल्या नायब तहसीलदार पतीचे इतर महिलेशी संबंध असल्याच्या रागातून त्यांच्या दोघात वाद झाल्याने दुपारी ३ च्या सुमारास मोतीबाग तलाव परिसरात चौपाटीवर काही नागरिक बसलेले असताना रागाच्या भरात आलेल्या जयश्री यांनी नागरिकांच्या समोर तलावाच्या भिंती वरुन तलावात उडी घेतली. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयन्त केला मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चंदणझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून महिलेचा मृत्युदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. आत्महत्या करणाऱ्या महिला ह्या नायब तहसीलदार गणेश पोलास यांच्या पत्नी असल्याची माहिती समोर आली.