नवी दिल्ली: पेरूमध्ये बसला झालेल्या एका भीषण अपघातात २४ प्रवासांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शनिवारी पहाटे अपघात झाला आहे.
माहितीनुसार, पेरूच्या सुदूर उत्तरेकडील एल अल्टो जिल्ह्यात एका कंपनीच्या बसला अपघात झाला. बसमधून एकूण ६० प्रवाशी प्रवास करत होते. बस पेरूची राजधानी लिमा येथून इक्वेडोरच्या सीमेजवळ असलेल्या तुंबेस प्रदेशासाठी निघाली होती. या दरम्यान हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथकांनी घटनास्थळी येत बचावकार्य सुरु केले.

दरम्यान, अनेक प्रवाशांनी बसमधून उडी मारून स्वत:ला वाचवले, मात्र बहुतांश प्रवासी आत अडकले. पोलिस सध्या अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.