मुंबई : प्रजासत्ताक दिन म्हणजे शाळेतील मुलांसाठी एका प्रकारचा सणच असतो. अनेकदा यादिवशी शाळेत परेड, भाषण यांसारख्ये कार्यक्रम होतात. त्यातच यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनादिवशीचा एका लहान मुलाचा भाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
प्रजासत्ताक दिनादिवशी शाळेत लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाचं भाषण करायला लावलं जात. असंच एका लहान चिमुकल्यानं केलेलं भाषण सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहताच अनेकांना हसू आवरेनासे झाले आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी लोकशाही सुरु झाली असल्याचं सांगत त्या मुलानं भाषणास सुरुवात केली.

आज लोकशाही दिन आहे. आजच्या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. या लोकशाहीमध्ये तुम्ही काहीदेखील करु शकता. भांडू शकता, दोस्ती करु शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा आणि खोड्या करायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडतं. अशा बोबड्या बोलानं त्यानं भाषणाची सुरुवात केली आहे.
मी असं केलं की बाबा मला मारत नाहीत कारण ते लोकशाही मानतात. गावातील पोरं माझं नाव संराना सांगतात. जशी लोकशाहीची मूल्ये आतंकवादी पायदळी तुडवतात तसं सर मला मग पायदळी तुडवतात. तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही असं म्हणातात आणि मला कोंबडा बनवतात. असे म्हणत त्याने लोकशाहीचे त्याने वर्णन केले आहे.
पुढे बोलताना तो म्हणतो, खर सांगतो माझ्यासारखा गरीब मुलगा तालुक्यात शोधून सापडणार नाही, एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो, असं म्हणत त्या चिमुकल्यानं त्याच्या भाषणाचा शेवट केला आहे.
पहा व्हिडीओ