Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रध्वजाचा अपमान प्रकरणी प्राथमिक शिक्षकावरती गुन्हा दाखल : जत तालुक्यातील घटना

0 647

जत : प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज उलटा फडकविण्याचा प्रकार घडल्याने जत तालुक्यातील जिल्हा परिषद कन्नड शाळेतील शिक्षक प्रभाकर इरगोंडा सलगर यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची उमदी पोलिसात फिर्याद संजयकुमार विठ्ठल माळी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बालगाव येथील बसवेश्वर चौकात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज कार्यक्रम गुरुवारी सकाळी नऊ वाजता सुमारास सुरू होता. सदरच्या ठिकाणचा राष्ट्रध्वज हा वरती केसरी रंगाच्या ऐवजी हिरवा रंग अशी बांधणी शिक्षक प्रभाकर सलगर यांनी केली होती. याबाबत सलगर यांना माहिती असणं गरजेचे होते. दरम्यान, सदर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी गावातील दुंडाप्पा शेकाप्पा कोटी रा. बालगाव हे पुढे गेले. त्यावेळी राष्ट्रध्वज बांधणारे जिल्हा परिषद शिक्षक प्रभाकर इरगोंडा सलगर यांनी दुंडाप्पा कोटी यांना झेंडा फडकविण्याची दोरी हातात दिली तसेच दुसरी दोरी सलगर यांनी स्वत:च्या हातात धरून उभारले.

Manganga

यानंतर राष्ट्रध्वज सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रध्वजाचा केसरी रंग हा वर असणे गरजेचे असताना तो खाली व हिरवा रंग वर अशा स्थितीत सदरचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. त्यामुळे राष्ट्रध्वजाची अवहेलना झाली. त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या अपमान झाल्याने सलगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!