माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्हीएचएस ट्रेडर्स या कंपनीच्या ढेमरे बंधू सह दोघांच्या वर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद गिरीश सुकुमार कोठावळे यांनी आटपाडी पोलीसात फिर्याद दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, व्ही.एच.एस ट्रेडर्स एल.एल.पी या कंपनीचे संचालक/प्रोप्रायटर यांनी फिर्यादी यांना व्ही.एच.एस ट्रेडर्स एलएलपी ही कंपनी शेअर्स मार्केट मध्ये ट्रेडींग करुन गुंतवणुकदारांना दरमहा १० टक्के परतावा देत असल्याचे सांगुन फिर्यादीस त्यांचे कंपनीत १,१८,९५,०००/- रुपये रोख व बँक खात्याव्दारे गुंतवणुक करणेस प्रवक्ते करुन फिर्यादीना त्यांचे गुंतवणुक रक्कमेच्या सुरक्षेपोटी फिर्यादीस आरोपी यांनी त्यांचे बँक खातेचे १ कोटी रुपये रक्कमेचे चेक व ३ लाख रुपये रक्ककम भरलेची पावती दिली. फिर्यादी यांना त्यांचे गुंतवणुक रक्कमेचा ‘परताव्याबाबत आरोपींनी दिले आश्वासनाप्रमाणे कोणताही परतावा न देता त्यांचा विश्वासघात करुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे.

तसेच फिर्यादी यांचे प्रमाणे साक्षीदार १) रोहन रामलिंग पाटणे रा. आटपाडी यांची ३,६०,०००/- रुपये रकमेस व २) अमर महारुद्र हेकणे रा.आटपाडी यांची ४,७५,०००/- रुपये रक््कथमेस अशी दोघांची मिळुन ९,००,०००/- रुपये गुंतवणुक करुन घेवुन त्यातील त्यांना ६५,०००/- रुपये रक्क म परतावा देवुन त्यांची उर्वरीत रक्कम ८,३५,०००/- रुपये रक्कवम परत न करता फिर्यादी व नमुद साक्षीदार यांची मिळुन एकुण १,२७,३०,०००/- रुपये (एक कोटी सत्तावीस लाख तीस हजार रुपये) रक्कमेची व्हिएचएस ट्रेडर्स एलएलपी आटपाडी या कंपनीचे संचालक/प्रोप्रायटर यांनी संगनमत करुन आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकरणाचा अधिकत तपास स.पो.नि. सुधीर पाटील हे करीत आहेत.