औरंगाबाद : एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये कधीही बिघाडी होईल असा दावा केला जात असतांना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये एमआयएम पक्षाने सहभागी होण्यासाठी जाहीर केले आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत औरंगाबादमध्ये जाहीर केले आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला खुली ऑफरच देऊन टाकली आहे.
एमआयएम पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करायला तयार आहे. भाजपला रोखायची महाविकास आघाडीची इच्छा असेल तर आम्ही सोबत निवडणुका लढवायला तयार आहोत असेही इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे शिवसेना ज्या महाविकास आघाडीमध्ये आहे. त्या महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश नाहीये, त्यातच एमआयएमने वंचितच्या भूमिकेनंतर महत्वाची भूमिका घेतली आहे.

एमआयएमने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाण्याची इच्छा औरंगाबादमध्ये बोलून दाखवली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती 2019 ला होती. त्यातून वंचित बहुजन आघाडी ठाकरे गटासोबत गेली आहे.