Latest Marathi News

BREAKING NEWS

जेव्हा जयंत पाटील भाजपच्या युवा नेत्याशी गप्पा मारतात… जिल्ह्यात चर्चेचा विषय

0 378

इस्लामपूर: काही ठिकाणी भाजपसह इतर पक्षांची ताकद दिसली. जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांचा अद्याप अंदाज नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक हे आमदार असले तरी सत्तेत नाहीत. त्यामुळे सर्वच नेते राजकारण विसरून नैमित्तिक कार्यक्रमात भेटीगाठी घेत दिलखुलास इस्लामपुरातील एका विवाह सोहळ्यात शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती दिसली.

जयंत पाटील यांची उपस्थिती हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पाटील यांच्याकडे सध्या मंत्रिपद नाही. त्यामुळेच तेही अशा कार्यक्रमांत थांबताना दिसू लागले आहेत. अशा कार्यक्रमात विरोधकांना जवळ घेऊन गप्पांचा फड जमवण्यात त्यांचा हातखंडा आहे. शुक्रवारी या लग्नातही त्यांनी भाजपचे नेते राहुल महाडिक भेटताच दिलखुलास गप्पा मारल्या.

Manganga

 

या गावांमध्ये राहुल महाडिक, निशिकांत पाटील, संभाजी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार व हुतात्मा गटाने शिरकाव केला आहे. मागील काही विधानसभा निवडणुकांत जयंत पाटील यांच्या विरोधात दिवंगत अशोकदादा पाटील, वैभव नायकवडी, निशिकांत पाटील, गौरव नायकवडी यांची ताकद दिसली आहे. मात्र महाडिक बंधू त्यांच्या विरोधात थेट मैदानात उतरलेले नाहीत. त्यामुळे राहुल महाडिक यांची भेट आणि गप्पा चर्चेचा विषय ठरल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!