नाशिक : राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची शहरात मोठ्या प्रमाणात खरेदी -विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती लागला असून चालकास बेड्या ठोकत पथकाने टेम्पोसह गुटखा असा सुमारे सव्वा चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.
