Latest Marathi News

BREAKING NEWS

क्षेपणास्त्र हल्ला; ११ जणांचा मृत्यू, ११ जखमी

0 826

 

 

नवी दिल्ली: रशियाने गुरुवारी युक्रेनवर ५५ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. या हल्ल्यात युक्रेनमधील ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर इतर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याची घोषणा केल्याच्या एका दिवसानंतर रशियाकडून हा हल्ला करण्यात आले.

 

Manganga

गुरुवारी रशियाने युक्रेनवर डागलेल्या ५५ क्षेपणास्त्रांमुळे राजधानी किव्ह आणि आजुबाजुच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. तसेच या हल्ल्यात ११ युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला असून इतर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेचे प्रवक्ते अलेक्झांडर खोरुन्झी यांनीही ११ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. तसेच रशियाने डागलेल्या ५५ क्षेपणास्त्रांपैकी ४७ क्षेपणास्त्र पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध करत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांविषयी संवेदना व्यक्त केल्या आहेत. यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते वेदांत पटेल, यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!