Latest Marathi News

BREAKING NEWS

 

दुबई आणि चीनमध्ये नोकरीच्या नावाखाली हजारो तरुणांची फसवणूक

0 296

 

 

दुबई आणि चीनमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून हजार तरुणांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या एका टोळीविरोधात सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सायबर क्राईम पोलिसांनी गुरुवारी दिल्ली, गुरुग्राम आणि फतेहाबाद येथील बाह्य-उत्तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यावेळी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

 

या आरोपींनी दिल्ली एनसीआरसह आसपासच्या भागातील तरूणांना परदेशातल्या नोकरीचे अमिष दाखवले होते. चीन आणि दुबई येथे ऑनलाईन नोकऱ्या देण्याच्या नावाखाली हजारो तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. चीन आणि दुबई येथील आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या सहभागाने हे कारस्थान रचल्याची माहिती बाह्य उत्तर जिल्ह्याच्या सहाय्यक पोलीस उपायुक्तांच्या हवाल्याने दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.