Latest Marathi News

BREAKING NEWS

अदानी साम्राज्याला हादरा बसणारा ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ आहे तरी काय?

0 618

मुंबई : हिंडेनबर्ग रिसर्चने एका अहवालात स्टॉक फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा हवाला देत अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याने तब्बल 54 हजार कोटींचा दणका बसला आहे. त्यामुळे अदानी साम्राज्याला हादरा बसणारा ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ आहे तरी काय? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च काय आहे
नॅथन अँडरसन हे हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यवसायात पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी डेटा कंपनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंक येथे वित्त क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली, जिथे त्यांनी गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांमध्ये काम केले.

Manganga

अदानी समूहाला मोठा आर्थिक फटका
हिंडेनबर्ग रिसर्च अहवालामुळे दानींच्या संपत्तीत सात अब्ज डॉलरने घट झाली आहे. त्यामुळे अदानी समूह अमेरिकास्थित हिंडेनबर्ग रिसर्चविरोधात कायदेशीर कारवाईची चाचपणी करण्याची शक्यता आहे.?

काय आहेत आरोप अदानी ग्रुपवर
हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपवर स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हिंडेनबर्ग रिसर्चकडून अदानी ग्रुपवर संशोधन सुरु होते. हे करत असताना त्यांनी अदानी ग्रुपशी संबंधित माजी अधिकाऱ्यांशी माहिती संकलित केली आहे. हिंडेनबर्गने 2017 पासून किमान 16 कंपन्यांमध्ये संभाव्य गैरकृत्यांचा भांडाफोड केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!