Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगली : संविधान स्तंभाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

0 436

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

संविधान स्तंभ लोकार्पण समारंभास महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जिल्हाी नियोजन अधिकारी सरीता यादव आदि मान्यवर उपस्थित होते.

Manganga

संविधान स्तंभ बनविण्यासाठी ५२५ किलो ब्राँझ मटेरियलचा वापर करण्यात आला असून स्तंभाच्या मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेण्यात आली आहे. संविधान स्तंभाची उंची ५ फूट असून आणि व्यास अडीच फूटाचा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमानंतर मिरज येथील परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महापालिका आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 21 हजार वह्यांचे वितरण पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!