सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा परिसरातील एका ३६ वर्षीय पतीने पत्नी शारीरिक सुख देत नसल्याच्या कारणावरून बिबवेवाडी परिसरातील हिरामण बनकर शाळा सुखसागरनगर येथे २७ वर्षीय पत्नीवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत पत्नी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

परंतु पती त्यानंतरही पत्नीस सतत फोन करून संपर्क साधत होता. पत्नी शारीरिक सुख देत नसल्याचे आणि सोबत नांदत नसल्याचा राग मनात धरून त्याचेकडील चाकूने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिला जखमी करून शिवीगाळ करून पसार झाला.
याप्रकरणी आरोपी पतीविरोधात पत्नीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. सदरचा प्रकार २३ जानेवारीला घडला. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक छाया गादिलवाड करत आहे.