माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : मिरजेतील वादग्रस्त जागे बाबत तहसीलदार यांनी मिळकतधारांच्या बाजूने निकाल दिला असला तरी, मिरजेतील ‘ती’ जागा आमची असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
मिरज तहसीलदारांनी दिलेल्या निकालानंतर स्वतः आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुढे येत निकाल माझे भाऊ ब्रह्मानंद पडळकरच्या विरोधात वगैरे काही नसल्याचे म्हटलं आहे. तालुका दंडाधिकारी यांनी दिलेला अंतिम निकाल आमच्या वकिलांनी पूर्ण वाचला असून निकालात माझे भाऊ ब्रह्मानंद पडळकरच्या नावावरील प्लॉटचा कब्जा तहसीलदारांनी मान्य केला आहे, असा दावाही पडळकर यांनी केला.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या जागेत कोणीही अतिक्रमण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही पडळकर यांनी दिला. ज्या 17 मिळकतधारकांनी कब्जा मिळाल्याचे सांगितलं आहे त्यांचा आणि आमच्या मिळकतीशी कोणताही संबंध नसल्याचेही पडळकर यांनी म्हटलं आहे.

तसेच ज्या जागेचा वाद आहे ती सिटीसर्वेनुसार आपल्याच कब्जात असल्याचाही तहसीलदारांच्या निर्णयानंतर स्पष्ट झाले असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. मात्र, ज्या 17 मिळकतधारकांनी जागेचा कब्जा मिळाल्याचं सांगितला आहे, त्यांच्या सिटी सर्व्हेचा नंबर हा वेगळा आहे, आणि आपल्या जागेचा नंबर वेगळा असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. (स्त्रोत :एबीपी माझा)