माणदेश एक्सप्रेस न्युज
राजेवाडी/देवानंद जावीर : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी, लिंगीवरे तसेच माण तालुक्यातील हिंगणी परीसरामध्ये काल सायंकाळी ७ च्या दरम्यान अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हरभरा, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या गहू पिकाच्या लोंभ्या तयार झाले असून पावसामुळे रोगाचे प्रमाण वाढून उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. तर ज्वारी काढणीला आल्यामुळे त्यावरही रोगाचा प्रादुर्भाव होणार असल्याचे शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे. याच बरोबर द्राक्षाच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्यावर आर्थिक संकट येण्याची असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
