Latest Marathi News

मंत्री नितीन गडकरी सांगली जिल्हा दौऱ्यावर : दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे

0 897

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शुक्रवार, दि. 27 जानेवारी 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 27 जानेवारी रोजी दुपारी 15.45 वाजता फलटण हेलिपॅड जि. सातारा येथून हेलिकॉप्टरने भिलवडी ता. पलूस, जि. सांगलीकडे प्रयाण. दुपारी 16.15 वाजता भिलवडी हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 16.30 वाजता चितळे जिनस कॅम्पसचे उद्घाटन व सिमेन लॅबला भेट. सायंकाळी 17.15 वाजता सिमेन लॅब येथून प्रयाण. सायंकाळी 17.30 वाजता चितळे कॅम्पस येथील सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 18.15 वाजता भिलवडी येथून आष्टा ता. वाळवा कडे प्रयाण. सायंकाळी 18.40 वाजता आष्टा येथे आगमन व 18.40 ते 19.15 वाजेपर्यंत पेठ नाका सांगली नॅशनल हायवे 4 च्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7.30 वाजता आष्टा येथून कोल्हापूरकडे प्रयाण.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!