Latest Marathi News

BREAKING NEWS

मिरजेतील ‘त्या’ वादग्रस्त जागेचा निकाल मिळकतदारांच्या बाजूने

0 3,660

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : मिरज येथील जागा ताब्यात घेण्यासाठी रातोरात दुकाने पाडल्याप्रकरचा निकाल हा मिळकतदारांच्या बाजूने लागला असून, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांना जागेवरील मिळकतधारांचा कब्जा सिद्ध करून दाखविण्यासाठी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागावी, असा आदेशही तहसीलदार कुंभार यांनी दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असणारी ५१ गुंठे जागा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रहमानंद पडळकर यांनी विकत घेतल्याचा दावा केला होता. सदर जागेवर मिळकतधारांनी अतिक्रमणे केली असून ती काढण्यासाठी ब्रह्मानंद पडळकर यांनी चार जेसीबी घेऊन दुकाने रातोरात पाडत, जागा माझीच असून अतिक्रमणे काढण्यासाठी दुकाने पाडली असल्याचा दावा त्यावेळी ब्रह्मानंद पडळकर यांनी केला होता.

Manganga

 

यावेळी झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी ब्रहमानंद पडळकर यांच्यासह शंभर जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर मिळकत धारकांकडून जागेवर प्रत्यक्ष कब्जा असण्याचा दावा करण्यात आल्याने तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी याबाबत सुनावणी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करून पाडलेली बांधकामे जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जागेवरील कब्जा सिद्ध करण्यासाठी तहसीलदार कुंभार यांनी पडळकर व मिळकतधारकांना जागेवरील कब्जा सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली होती. यासाठी तीन वेळा सुनावणी देखील घेण्यात आली. यासाठी शुक्रवारी (दि. 20) तहसीलदारांनी अंतिम सुनावणी घेतली. परंतु त्यावेळी देखील पडळकर यांच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यास पुन्हा मुदतवाढ मागितली होती. यावेळी मात्र तहसीलदार कुंभार यांनी ही मागणी साफ धुडकावून निकाल देणार असल्याचे जाहीर केले होते.

 

त्यानुसार तहसीलदार कुंभार यांनी घेतलेल्या सुनावणीमध्ये संबंधित वादग्रस्त जागेवर १७ मिळकतदारांचा कब्जा असल्याचे सिद्ध झाले होते. मिळकतधारांनी सादर केल्या कागदपत्रावरून संबंधित जागेवर मिळकतरांचा कब्जा आहे. या आदेशाविरुद्ध पडळकर यांनी न्यायालयात दाद मागावी, असे आदेश देखील तहसीलदार कुंभार यांनी यावेळी दिले.

 

🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन ‘माणदेश एक्सप्रेस’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!