माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : पहिल्या दलित स्त्री लेखिका तसेच ज्येठ आंबेडकरवादी साहित्यिक शांताबाई कांबळे यांचे वृद्धापकाळाने दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी पुणे येथे निधन झाले. त्या 101 वर्षाच्या होत्या. त्या शेवटच्या काळात पुण्यात आपल्या मुली कडे रहात होत्या. दलित पँथर चे अध्यक्ष दिवंगत प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या.
शांताबाई कांबळे ह्या दलित स्त्री लेखिका, शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात महुद बुद्रुक या गावी झाला. ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ या पुस्तकावर आधारित ‘नाजुका’ या नावाने एक दूरचित्रवाणी मालिका होती. शांताबाई कांबळे यांचा अनेक पुरस्काराने सन्मान झाला आहे, त्यांत दलितमित्र हा एक सन्मान आहे. त्यांच्या पुस्तकाचे अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय भाषेत भाषांतर झाले आहे.
