माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/प्रतिनिधी : म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील कुकुडवाड गावातील माणिकराव सुखदेव तुपे हा प्रत्येक महिन्या दोन महिन्याला नविन रिक्षा आणुन तो फिरवत असे. याबाबतची माहिती म्हसवड पोलीसांना समजताच सपोनि राजकुमार भुजबळ यांनी कर्मचाऱ्यासह माणिकराव तुपे यांची माहीती घेतली असता तो मुंबई येथून चोरून रिक्षा घेवून येवून त्या विकत असल्याची गोपनिय बातमी माहीती मिळाली.
याबाबत माणिकराव तुपे यांस ताब्यात घेवून त्यांचेकडे वापरत असलेला रिक्षा ताब्यात घेवून रिक्षाचे मालकीचे कागदपत्रांबाबत माहीती घेतली असता कोणतीही माहीती व समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांचे विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्यांचा पुढील तपास करण्याची मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, म्हसवड यांचेकडुन परवानगी घेवून तपास सुरू केला.

सदर गुन्ह्यांचे तपासात आरोपी यांचेकडे कसून तपास केला असता आरोपी यांचे ताब्यात आणखी दोन रिक्षा चोरुन आणल्याचे उघड झाले आरोपी याने चोरी केलेले तीनही अॅटो रिक्षा तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कामगिरी समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार भुजबळ, सहा. पोलीस निरीक्षक विशाल भंडारे, पोलीस उपनिरीक्षक व अमलदार नंदकुमार खाडे, देवानंद खाडे, शिवाजी जाधव, अमर नारनवर, किरण चव्हाण, नितीन निकम, सुरज काकडे, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, सतिष जाधव, यांनी केली असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंद केले.