Latest Marathi News

BREAKING NEWS

 

धक्कादायक! तरूणीने नातेवाईकांच्या घरी केली लाखो रूपयांची चोरी

0 134

मध्यप्रदेश: इंदुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने आपल्या नातेवाईकांच्याच घरी चोरी केली. पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यात सांगण्यात आले की, त्यांच्या घरी रहायला आलेल्या नातेवाईक तरूणी तिच्या प्रियकरासोबत मिळून घरात चोरी केली.

 

महिलेने पोलिसांना सांगितले की, तक्रार दाखल करण्याआधी महिलेने तरूणीला फोन करून दागिने आणि रोख रक्कम परत करण्यास सांगितले होते. यावर तरूणी म्हणाली की, तिला पैशांची आणि दागिन्यांची गरज होती. ती लवकरच ते परत करेल. त्यानंतर तिने तिचा मोबाइल बंद केला.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या दूरच्या एका नातेवाईकांची मुलगी इंदुरमध्ये शिकत आहे. ती एका खाजगी समस्येमुळे 2 दिवसांसाठी त्यांच्या घरी थांबण्यासाठी आली होती. परिवारातील लोक जेव्हा कामासाठी बाहेर गेले तेव्हा तरूणीने रोख रक्कम आणि दागिने लंपास केले. असं सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.