Latest Marathi News

BREAKING NEWS

धक्कादायक! शाळेमध्ये न विचारता पाणी पिणे विध्यार्थ्यांला पडले महागात….

0 69

मध्यप्रदेश: देवास जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षकाने इयत्ता 9वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केली. यामध्ये त्याचा दात तुटला आहे. न विचारता पाणी प्यायला म्हणून शिक्षा दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचे प्रकरण होली ट्रिनिटी या खासगी शाळेचे आहे. शिक्षकाने इयत्ता 9वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मारहाणीमुळे दात तुटला. यानंतर मुलाने वडिलांना याबाबत माहिती दिली. बेदम मारहाण करणारा शिक्षक कोण आहे, याची तातडीने चौकशी करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

Manganga

इयत्ता 9वीत शिकणारा सक्षम जैन मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याच्या वर्गात पाणी पीत होता. त्याचवेळी शिक्षक पीटरने पाणी पिण्यास नकार देत बाटलीनेच मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. यामुळे सक्षम जैन यांचा दात तुटला. अशा स्थितीत सक्षम हा त्याच्या वडिलांपर्यंत पोहोचला. यानंतर सक्षमचे वडील त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे घेऊन गेले.

यानंतर डीपीसी जैन यांनी इयत्ता 9वीत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे जबाब घेतले आणि सक्षमला मारणाऱ्या पीटरला याबाबत विचारलं. डीपीसीने शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले. आमची समिती लवकरच आरोपी शिक्षकाविरुद्ध निर्णय घेईल, असे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!