Latest Marathi News

BREAKING NEWS

२६ जानेवारीच्या आमरण उपोषणावर ठाम : मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण चालू राहणार असल्याचा इशारा

0 531

माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : येथील सातारा-पंढरपूर फोरलेन चे काम गत पाच सहा वर्षापासून अत्यंत, संथ गतीने सुरू असून म्हसवड पालिका हद्दीतील साखळी पूल ते पिलीव घाटापर्यंतचा रस्ता गेली सहा वर्षापासून नुसता खोदून ठेवला आहे. या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत. त्याबाबत अनेक संस्था संघटनानी आवाज उठवल्या नंतर खड्यांवर नुसती माती टाकुन खड्डे बुजवण्याचा फार्स करण्यात आला. मात्र या मातीमुळे रस्त्यावरून वाहने जाताना व येताना मोठ्या प्रमाणावर धुरळा उडत होता. याचा येथील नागरीकांना, व्यावसाईकांना होणारा त्रास याबाबत इंजि. सुनील पोरे यांनी म्हसवड शहराच्या रस्त्यालगत व चौका चौकात बॅनर लावून प्रशासनाला जाब विचारला होता व त्यावर त्वरीत उपाययोजना न केल्यास २६ जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

याचा परिणाम म्हणून रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात झाली मात्र हे प्रशासनाने चालू केलेले काम म्हणजे नुसते तोंडाला पाने पुसण्या सारखे असल्याचे इंजि. सुनिल पोरे यांनी म्हटले आहे. आमच्या मुख्य मागण्या, पुढील प्रमाणे असून त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही किंवा ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत माझे उपोषण चालू राहणार असल्याचे सांगितले.

Manganga

🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन ‘माणदेश एक्सप्रेस’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!