माणदेश एक्सप्रेस न्युज
राजेवाडी/देवानंद जावीर : राजेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये असणाऱ्या एकूण तीन अंगणवाडीतील १३७ मुलांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. सदरचे वाटप लोकनियुक्त सरपंच प्रशांत शिरकांडे व बीडीएस बँकेचे चेअरमन बाळासाहेब पाटील व ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब माने, वैभव हेगडे, तुकाराम हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अंगणवाडीच्या सेविका दिपाली मोरे, दिपाली कुंभार, सुषमा मोरे अंगणवाडीच्या मदतनीस ताई चंदनशिवे, शुभांगी मोरे, सायरा बानू तांबोळी यांच्या वतीने सरपंच ग्रामपंचायत सदस्य व बाळासाहेब पाटील यांना शाल व फेटा देऊन सत्कार केला. बाळासाहेब पाटील यांनी अंगणवाडीतील लाईट, पाणी, शौचालयाची दुरुस्ती लवकरच करू तसेच नजीक असलेल्या व्यायामशाळा दुरुस्तीचा प्रस्ताव टाकून जिमचे साहित्य लवकरच मिळवून देऊ असे आश्वासन दिले.
🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन ‘माणदेश एक्सप्रेस’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा