माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : सध्या हिंदू समाजावरती आक्रमण चालू आहे. धर्मांतराचा विषय गाव गाड्यापर्यंत पोहोचला आहे. लव्ह जिहादचे अनेक प्रकरणे सामोरे येत असल्याने केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत लव्ह जिहाद कायदा राज्य सरकारने निर्माण करावा आणि तो देशभर लागू करावा अशी मागणी आम. गोपीचंद पडळकर यांनी केली. ते विटा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्च्या प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी मोर्च्या मध्ये खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, किरण तारळेकर, दहावीर शितोळे, जगन्नाथ पाटील, नितीन जाधव आदीसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

मोर्चाला श्री भैरवनाथ मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात झाली. मोर्चा क्रांतिसिंह नाना पाटील चौक, ते मॉडर्न एज्युकेशन सोसायटी मार्गे साळशिंगे रस्त्यावरील चौंडेश्वचरी मंदिरापर्यंत काढण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना निवेदन देण्यात आले. यात लव जिहाद, सक्तीचे धर्मांतरण, गोवंश हत्या निर्बंध कायदा आणि वक्फ बोर्ड मान्यता रद्द करावी. आदी मागण्या केल्या आहेत.
🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन ‘माणदेश एक्सप्रेस’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा