Latest Marathi News

आवळाईत मरीमाता मंदिर पेंव्हींग ब्लॉक कामाचे भूमिपूजन

0 796

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील आवळाई येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचे प्रयत्नाने व पंचायत समिती आटपाडी, जिल्हा परिषद सांगली यांचे कडील तीर्थक्षेत्र विभागातून मरिमाता मंदिरा करिता पेंव्हींग ब्लॉक विकास कामाचे भूमिपूजन माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

यावेळी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, युवा नेते जयवंत सरगर, बाजार समितीचे माजी संचालक विष्णुपंत अर्जुन, आवळाईचे लोकनियुक्त सरपंच गजेंद्र पिसे, युवा नेते आबा भानवसे, आवळाई ग्रामपंचायतचे सर्व नूतन ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!