माणदेश एक्सप्रेस न्युज
माडगुळे/अक्षय झोडगे : माहिती व जनसंपर्क महासंचानालय जिल्हा माहिती कार्यालय सांगली यांच्या वतीने शासनाच्या विविध योजनाच्या प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम माडगुळे, भीमनगर येथील फांजरकार नानासाहेब झोडगे सभागृहाच्या समोर संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन माडगुळे गावच्या सरपंच संगीता विट्टल गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाहीर डॉ. अमोल रणदिवे आणि पार्टी दिघंची यांनी पोवाड्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये शेतकऱ्यासाठी जलभुजल योजना, राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशी भाड्याच्या सवलती योजना, ज्या शेतकऱ्याचे कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यासाठी महात्मा जोतिबा फुले कर्ज मुक्ती योजना, तसेच मुदतीत परत फेड करणाऱ्या शेतकऱ्याला डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, राज्यातील प्रत्येक वाड्या वस्त्यांना आपला रस्ता जोडला गेला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री सडक योजना, गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना आदी योजनांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमास माडगुळे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
