Latest Marathi News

BREAKING NEWS

पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण

0 169

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : महात्मा ज्योतीबा फूले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण राबविण्यात येते. त्याकरिता नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. यासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 जानेवारी 2023 आहे. महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे.

महाज्योतीमार्फत नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याकरिता असून हे प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रूपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणा दरम्यान पुस्तके, गणवेश देखील देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवाराने महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेत स्थळावरील नोटीस बोर्डमधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!