माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पाणी योजनेची खंडीत करण्यात आलेली वीज आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नामुळे सुरळीत झाली असून यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असल्याचे प्रतिपादन आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दत्तात्रय पाटील यांनी केले.
आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले नंतर या ठिकाणचा कारभार हा प्रशासकांच्या देखरेखखाली सुरु आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा वीज पुरवठा थकीत बिलापोटी वीज मंडळाने खंडित केल्याने याचा मोठा फटका नागरिकांना बसणार होता.
परंतु आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दत्तात्रय पाटील यांनी सदर बाब आम. अनिलभाऊ त्यांच्या कानावर घातली. आम. अनिलभाऊ बाबर यांनी याबाबत महा वितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत यावर तोडगा काढत खंडित केलेला वीज पुरवठा सुरु केल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नी निकाली निघाला आहे.
आगामी काळात आमदार अनिलभाऊ बाबर व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे दत्तात्रय पाटील म्हणाले.