आटपाडी : रक्तदान शिबिरास आम. पडळकरांची भेट
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : येथील कल्लेश्वर मंदिर सभागृहात ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास आम. गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली.
यावेळी माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, रिपाइंचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन उत्तम जाधव, युवा नेते अनिल पाटील, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, सोमनाथ राक्षे, चंद्रकांत काळे, युवराज देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरानंतर कल्लेश्वर मंदिर सभागृह येथे आमदार गोपीचंद पडळकर व मा.आम. राजेंद्रआण्णा देशमुख यांनी स्थानिक नागरिकांशी विविध प्रश्नी संवाद साधला. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने आम. गोपीचंद पडळकर यांचा राजेंद्रआण्णा देशमुख यांनी यावेळी सत्कार केला.

संतोषी मेडिकलचे उद्घाटन
आटपाडी शहरातील मेन व्यापारी पेठेमध्ये संतोषी मेडिकलचे उद्घाटन आम. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.जि.प.सदस्य अरुण बालटे, मा. चेअरमन उत्तम जाधव, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, युवा नेते अनिल पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.