Latest Marathi News

आजचे  राशीभविष्य, रविवार २२ जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 668

 

मेष:-

Manganga

स्वभावात चंचलता येईल. कामाचा आनंद घ्यावा. लहानांशी मैत्री कराल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

 

 

 

वृषभ:-

आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करता येईल. पचनाच्या तक्रारी राहतील. जुन्या गोष्टीत अडकून पडाल. विचारातून कर्मठपणा दर्शवाल. वडीलांचे मत विरोधी वाटू शकते.

 

 

मिथुन:-

कामाचे योग्य नियोजन करावे. प्रकृतीच्या बाबत हयगय करू नका. घरातील कामात अधिक गुंतून राहाल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

 

 

कर्क:-

शांतपणे विचार करावा. जवळच्या प्रवासाची मजा घ्याल. आधुनिकतेने विचार करून पहावा. जवळचे मित्र जमवाल. आपल्या छंदाला अधिक वेळ द्यावा.

 

 

सिंह:-

कफ विकाराचा त्रास संभवतो. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतात. मानसिक शांतता जपावी लागेल. काही गोष्टी दिरंगाईने पार पडतील. पायाचे त्रास दुर्लक्षित करू नका.

 

 

कन्या:-

मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करावा. घरातील प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. बौद्धिक दृष्टीकोन ठेवावा. दिवस आनंदात घालवाल.

 

 

तूळ:-

योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करावा.  घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. फार विचार करू नयेत. कष्टाला मागेपुढे पाहू नका. चिकाटीने कामे करण्यावर भर द्यावा.

 

 

वृश्चिक:-

चटकन निराश होऊ नका. काही गोष्टींचे चिंतन करावे. काही गोष्टींचा सखोल विचार करावा. धैर्याने कामे हाती घ्यावीत. तुमच्या पराक्रमाला चांगला वाव मिळेल.

 

 

धनू:-

कंजूषपणा दाखवू नका. स्थावरची कामे मार्गी लागतील. अगदी मोजकेच बोलाल. चिकाटीने अनेक कामे हाती घ्याल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल.

 

 

मकर:-

सर्वांच्या आनंदात सहभागी व्हाल. प्रौढपणे वागणे ठेवाल. तुमचा मान वाढेल. चटकन निराश होण्याचे कारण नाही. अडथळ्यातून मार्ग निघेल.

 

 

कुंभ:-

गप्पा मारण्यात रंगून जाल. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. काही मापदंड ठरवून घ्यावेत. आलेल्या संधीचा लाभ उठवावा.

 

 

मीन:-

चैनीच्या वस्तु खरेदी कराल.  सामाजिक कामात हिरीरीने सहभाग नोंदवाल. काहीसे स्व‍च्छंदीपणे वागाल. जोडीदाराचा प्रेमळपणा दिसून येईल. मानाने कामे हाती घ्याल.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!