Latest Marathi News

BREAKING NEWS

तळेवाडीत हातभट्टीवर छापा : शेतातच सुरु होती हातभट्टी : पोलिसात गुन्हा दखल

0 1,744

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील तळेवाडी येथे बेकायदा, बिगरपरवाना हातभट्टी वर पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत आरोपी नारयण सुदाम सरगर याच्यावर महारष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम नुसार पोकॉ बजरंग सरगर यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तळेवाडी येथे बंदी असलेली हातभट्टी दारू सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत पोलिसांनी खात्री करत तळेवाडी येथील आरोपी नारायण सुदाम सरगर याच्या शेतात छापा मारला असता, विहिरी शेजारी तो हातभट्टीची दारू काढत होता. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेला. याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!