माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात सदर महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राजेवाडी येथील फिर्यादी यांना शेजारी बांधकामाच्या ठिकाणी असलेला आरोपी दीपक नामदेव खांडेकर याने फिर्यादीस वाईट नजरेने बघून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत फिर्यादीच्या सासऱ्याने आरोपीस याबाबत जाब विचारला असता त्यास आरोपीने लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

याबाबत फिर्यादीच्या फिर्यादीनुसार आरोपी दीपक नामदेव खांडेकर याच्या विरुद्ध कलम ३५४, ३२३, ५०४, ३४ नुसार आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास पोह मिसाळ करीत आहेत.