Latest Marathi News

आजचे  राशीभविष्य, शनिवार २१ जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 1,149

 

मेष:-

Manganga

कामाची धावपळ वाढेल. मोठ्या लोकांत उठबस वाढेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जवळचे मित्र भेटतील. उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवेल.

 

 

वृषभ:-

कलागुणांना चांगला वाव मिळेल. बोलण्यातून कामे मिळवाल. व्यापरिवर्गाला दिवस चांगला जाईल. इतरांची मने जिंकून घेता येतील. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल.

 

 

मिथुन:-

मनाची विशालता दाखवाल. कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. धार्मिक भावना जोपासाल. लहान प्रवास कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

 

 

कर्क:-

पैज जिंकता येईल. आवडते पदार्थ चाखाल. कलेला पोषक वातावरण मिळेल. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदारा बरोबर गप्पा-गोष्टी कराल.

 

 

सिंह:-

वाहन विषयक कामे पार पडतील.  मानसिक व्यग्रता जाणवेल. जमिनीच्या कामात लक्ष घालाल. आपला ठसा उमटवाल. घरातील गोष्टी शांततेत हाताळाव्यात.

 

 

कन्या:-

व्यसनाच्या आहारी जाऊ नये. फार काळजी करू नये. सामाजिक बांधिलकी जपाल. काही गोष्टी पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. ऐशारामाच्या वस्तूंची आवड निर्माण होईल.

 

 

तूळ:-

तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. आत्मविश्वास वाढीस लागेल. जवळच्या मित्रमंडळींशी गप्पांमध्ये रमून जाल. नवीन स्नेहसंबंध जोडले जातील.

 

 

वृश्चिक:-

घरात टापटीप ठेवाल. प्रत्येक गोष्टीत समाधान मानाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. आनंदाने एकमेकांना मदत कराल.

 

 

धनु:-

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. गोड बोलून कामे मिळवाल. फोटोग्राफीची हौस पूर्ण करता येईल. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल.

 

मकर:-

श्रम वाढतील. आपले विचार उत्कृष्ठपणे मांडाल. बौद्धिक चलाखी वापराल. योग्य तर्क वापराल. हसत हसत कामे पूर्ण कराल.

 

 

कुंभ:-

आर्थिक गुंतवणूक सावधगिरीने करावी. झोपेची तक्रार जाणवेल. काही कामे अडकून पडतील. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. मानापमानाच्या गोष्टी फार मनावर घेऊ नयेत.

 

 

मीन:-

सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. लहानांशी मैत्री कराल. योग्य कागदपत्रे सादर करावीत. मानाने कामे कराल. चांगला आर्थिक लाभ होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!