Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, शुक्रवार २० जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 749

 

मेष:-

Manganga

मुलांच्या सहवासात रमाल. योग्यप्रकारे आकलन करू शकाल. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल. आपले विचार तरलपणे मांडाल. जुगाराची आवड पूर्ण केली जाईल.

 

 

 

वृषभ:-

तुमच्या मताचा आदर केला जाईल. तुमचा रुबाब राहील. शिस्तीचा बडगा करू नका. घरातील कामात अधिक लक्ष घालावे. काहीवेळा माघार घ्यावी लागेल.

 

 

मिथुन:-

मजेत प्रवास कराल. हातात काही नवीन गोष्टी येतील. गंभीरपणे विचार कराल. सढळपणे इतरांना मदत कराल. वैचारिक प्रौढता दाखवाल.

 

 

कर्क:-

दिवस घरातील कामात व्यतीत होईल. आपल्याच मतावर आग्रही राहाल. जोडीदाराचा विचार जाणून घ्याल.  आवडी-निवडीबाबत ठाम भूमिका घ्याल. गोड बोलण्यावर भर द्याल.

 

 

सिंह:-

भावनाशीलतेने विचार कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे प्रेम सौख्य वाढेल. सर्वांशी आदराने वागाल. वागण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल.

 

 

कन्या:-

लिखाणात मन रमवाल. बुद्धीवादी विचार कराल. स्वबळावर विश्वास ठेवावा. तुमच्यातील धाडस वाढेल. स्वभावात काहीसा कठोरपणा येईल.

 

 

तूळ:-

अधिकारात वाढ संभवते. आर्थिक जबाबदारी वाढेल. तिखट पदार्थ चाखाल. गोष्टींची उपयुक्तता लक्षात घ्यावी. अनाठायी होणार खर्च टाळावा.

 

 

वृश्चिक:-

कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्याल. ऊर्जेने कामे हाती घ्याल. स्नायू धरणे यांसारखे त्रास जाणवतील. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. काही गोष्टीत विरोध होऊ शकतो.

 

 

धनु:-

नातलग भेटतील. उत्कृष्ट काव्यस्फूर्ती लाभेल. इतरांचे कौतुक कराल.  प्रवासाची हौस पूर्ण कराल. आनंददायी दृष्टकोन ठेवाल.

 

 

मकर:-

सामाजिक कार्यात हातभार लावाल. गायन कलेला चांगला वाव मिळेल. सर्वांशी गोडीने वागाल. आर्थिक स्थैर्य लाभेल. महिला दागदागिने खरेदी करतील.

 

कुंभ:-

बोलण्यात माधुर्य ठेवाल. फॅशनची हौस पूर्ण करता येईल. चांगले विवाह सुख लाभेल. प्रत्येक गोष्टींचा रसास्वाद घ्याल. उत्तम व्यक्तिमत्वाची छाप पडेल.

 

 

मीन:-

स्वकष्टावर कामे करण्याकडे कल राहील. प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. कामाची तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. उपासनेला बळ मिळेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!