माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील चिंचघाट ते बनपुरीला जोडणाऱ्या पुलाचा लोकार्पण सोहळा आम. अनिलभाऊ बाबर व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
आटपाडी तालुक्यातील बनपुरी, करगणी, चिंचघाट असा जिल्हा मार्ग आहे. परंतु या मार्गावर पूरहानी मुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले होते. तर अनेक लहान पुलांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे बनपुरी, करगणी, चिंचघाट ला जोडणाऱ्या पुलाची दुरुस्ती होवून नवीन पूल तयार झाल्याने या ठिकाणहून ये-जा करणे आता वाहनधारकांना सोपे जाणार आहे. सदर पुलाचा लोकापर्ण सोहळा दि. १७ रोजी आम. अनिलभाऊ बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाला.

यावेळी आम.अनिलभाऊ बाबर व तानाजीराव पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आटपाडी ग्रामपंचायतचे मा. सदस्य दत्तात्रय पाटील, युवा नेते विनायक मासाळ, करगणीचे सरपंच गणेश खंदारे, चेअरमन दत्तात्रय पाटील मा. सरपंच विजय सरगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.